बातम्या

उषाराजे हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण शिबिर

HPV vaccination camp at Usharaje High School


By nisha patil - 8/30/2025 3:47:21 PM
Share This News:



उषाराजे हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण शिबिर

विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग, कॅन्सरमुक्ती मोहिमेला चालना

कोल्हापूर : उषाराजे हायस्कूलमध्ये मुश्रीफ फाउंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एच.पी.व्ही. लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थिनींनी मोठा प्रतिसाद दिला. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुक्तीसाठी इनरव्हील क्लबने घेतलेली ही पुढाकारयुक्त मोहीम कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

दर आठ मिनिटांनी एक महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडते, ही गंभीर बाब आहे. त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून एचपीव्ही लस उपयुक्त ठरते, हे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील ९ ते २६ वयोगटातील मुली व अविवाहित तरुणींसाठी मोफत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पालकांच्या संमतीने या मोहिमेत मोठ्या संख्येने मुली सहभागी होत आहेत.


उषाराजे हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण शिबिर
Total Views: 66