बातम्या

ग्रामीण रुग्णालय आजरा येथे एच पी व्ही लसीकरण मोहीम शुभारंभ व जागतिक मौखिक आरोग्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

HPV vaccination campaign launched at Rural Hospital Ajra

By Administrator - 3/20/2026 5:47:53 PM
Share This News:

ग्रामीण रुग्णालय आजरा येथे एच पी व्ही लसीकरण मोहीम शुभारंभ व जागतिक मौखिक आरोग्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा
 
आजरा (हसन तकीलदार):-आज दिनांक 20 मार्च 2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आजरा येथे 21 लसी एच पी व्ही लसीकरण मोहीम शुभारंभ व जागतिक मौखिक आरोग्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील  यांनी केले.

डॉक्टर प्राचीका धारकर यांनी जागतिक मौखिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने मौखिक आरोग्य व दातांची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. एच पी व्ही लसीकरण हे महिलांच्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगा विरुद्ध प्रभावी अस्त्र आहे. व ही लसीकरण मोहीम सर्वांनी यशस्वी करूया असे आवाहन नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांनी यावेळी केले. यावेळी नगरसेविका खेडेकर मॅडम, नगरसेवक  बामणे भाऊजी, नगरसेवक  अनिकेत चराटी, आमदार प्रतिनिधी विजय थोरवत, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र गुरव, ग्रामीण रुग्णालय आजरा मधील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉक्टर सुरजित पांडव यांनी केले.

ग्रामीण रुग्णालय आजरा येथे एच पी व्ही लसीकरण मोहीम शुभारंभ व जागतिक मौखिक आरोग्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा
Total Views: 372