बातम्या
भडगाव : हनुमान देवालय वास्तुशांती व कलशारोहण सोहळा उत्साहात पार
By nisha patil - 5/31/2025 3:19:45 PM
Share This News:
भडगाव : हनुमान देवालय वास्तुशांती व कलशारोहण सोहळा उत्साहात पार
भडगाव (ता. कागल) येथील ग्रामदैवत हनुमान देवालयाच्या वास्तुशांती व कलशारोहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
“परमेश्वराच्या कृपेने शेकडो मंदिरांचे बांधकाम आणि जीर्णोद्धार करण्याचे भाग्य लाभले, त्यामुळेच माझे जीवन कृतार्थ वाटते,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केली.
या वेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मंदिरासाठी ७० लाखांचा निधी जाहीर केला. सुशोभीकरण व विद्युतीकरणासाठी २० लाख आणि शाळेसाठीही निधी देण्याचे आश्वासन दिले.
माता-भगिनींची मोठी उपस्थिती लक्षणीय ठरली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल कुंभार यांनी केले.
भडगाव : हनुमान देवालय वास्तुशांती व कलशारोहण सोहळा उत्साहात पार
|