बातम्या
अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्याना....
By nisha patil - 1/7/2026 2:01:16 PM
Share This News:
*अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्याना..... !*
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईकसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी अभिवादन केले. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील त्यांची अतुलनीय योगदान लक्षात घेऊन, एक जुलै हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाकडून 'कृषी दिन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.
यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय वसंतराव नाईकसाहेब यांचे महाराष्ट्राच्या हरितक्रांती आणि कृषी क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळात त्यांनी राज्यात अन्नधान्य टंचाईवर मात करण्यासाठी 'हरित क्रांती' ची पायाभरणी केली. आधुनिक शेती, सिंचन प्रकल्प आणि बियाण्यांच्या संशोधनाला प्राधान्य दिले. त्यामुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची यशस्वी अंमलबजावणी केली. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी 'रोजगार हमी योजना' सुरू केली.
अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्याना....
|