बातम्या
दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत हर्षदा देशमुख-जाधवांनी बजावला मतदानाचा हक्क
By nisha patil - 10/23/2026 11:06:31 AM
Share This News:
दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत हर्षदा देशमुख-जाधवांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या दिवशी त्यांनी सर्वप्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि बाप्पांच्या चरणी सुख, समृद्धी व सर्वांना योग्य दिशा मिळावी, अशी प्रार्थना केली. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात बाप्पांच्या चरणी होते, या भावनेतून त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक वर्षांचा प्रवास, असंख्य भेटी आणि भेटलेली माणसे त्यांच्या डोळ्यांसमोर आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या सर्वांना सुख, समृद्धी आणि योग्य दिशा मिळावी, अशी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनींनीही जागरूक नागरिक म्हणून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही अधिक सशक्त करूया, असा संदेश देत प्रत्येक पात्र मतदाराने मतदानासाठी पुढे यावे, असे आवाहन हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.
दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत हर्षदा देशमुख-जाधवांनी बजावला मतदानाचा हक्क
|