बातम्या
विजयादशमीला हर्षदा देशमुख-जाधव माहेरी! लोधवडेत ग्रामदैवतांचे घेतले दर्शन
By nisha patil - 10/20/2026 4:10:55 PM
Share This News:
विजयादशमीला हर्षदा देशमुख-जाधव माहेरी! लोधवडेत ग्रामदैवतांचे घेतले दर्शन
विजयादशमीच्या मंगलमय पर्वानिमित्त पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी माण तालुक्यातील लोधवडे येथे आपल्या माहेरी भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामदैवतांचे भक्तिभावाने दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
माहेरी आगमन झाल्यानंतर घरी औक्षण करून त्यांचे प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत करण्यात आले. कुटुंबीयांच्या प्रेमळ सहवासाने आणि माहेरच्या मायेने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. माहेरची माया, कुटुंबीयांचे प्रेम आणि ग्रामदैवतांचे आशीर्वाद यांचा सुंदर संगम या विजयादशमीच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला. त्यामुळे यंदाचा दसरा सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांच्यासाठी भावनिक, आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.
विजयादशमीला हर्षदा देशमुख-जाधव माहेरी! लोधवडेत ग्रामदैवतांचे घेतले दर्शन
|