विशेष बातम्या
हसन मुश्रीफ : राहुल-राजेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला हत्तीचे बळ; कोल्हापुरात विकासाची ग्वाही
By nisha patil - 8/23/2025 4:40:12 PM
Share This News:
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना राहुल व राजेश पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हत्तीचे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आमदार सतेज पाटील यांनी हाळवे होऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापुरात खंडपीठ स्थापन झाल्यानंतर जिल्ह्याचा २०% जीडीपी वाढेल. शहराची हद्दवाढ, आयटी पार्क, शेंडा पार्क येथील इमारत उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. रस्त्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निधी आणण्याची ग्वाही त्यांनी दिली.
गोकुळ दूध संघाच्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले की, उत्पादकांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. तसेच शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे नेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सनदी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असल्याचे त्यांनी समर्थन केले. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांबाबत मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापुरात आजतागायत असा आरोप झालेला नाही.
हसन मुश्रीफ : राहुल-राजेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला हत्तीचे बळ; कोल्हापुरात विकासाची ग्वाही
|