बातम्या
हसन मुश्रीफ यांना संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन
By nisha patil - 6/18/2025 9:45:55 PM
Share This News:
हसन मुश्रीफ यांना संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन
पुणे, दि. १८ : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देहू येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथे सदगुरु श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन चरणी नतमस्तक होत कृतार्थतेची भावना व्यक्त केली.
या वर्षी संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनाची ३७५ वी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माची ७५० वी जयंती असून, या निमित्ताने मंत्री मुश्रीफ यांनी दोन्ही तीर्थक्षेत्री भेट देत संस्थान पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वारकरी संप्रदायाला साष्टांग दंडवत करत, हा सोहळा जगातील सर्वात मोठा परमार्थिक सोहळा असल्याचे गौरवोद्गार काढले.
हसन मुश्रीफ यांना संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन
|