बातम्या
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन......
By nisha patil - 11/4/2026 4:31:43 PM
Share This News:
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन.......
कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण
कागल, दि. ११: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी ऐतिहासिक गैबी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या पुतळ्यानाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, बच्चन कांबळे, रुपेश वाघमारे, अभिजित कांबळे, अंकुश कांबळे, सागर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
कागल- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांनी गैबी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या पुतळ्याना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन......
|