विशेष बातम्या
"हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते, पण धर्म आडवा आला!" — संजय राऊत यांचे पुस्तकात मोठे विधान
By nisha patil - 5/17/2025 12:20:35 AM
Share This News:
"हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते, पण धर्म आडवा आला!" — संजय राऊत यांचे पुस्तकात मोठे विधान
कोल्हापूर,: शिवसेना नेते व माजी खासदार संजय राऊत यांनी तुरुंगवासादरम्यान लिहिलेल्या "नरकातला स्वर्ग" या पुस्तकात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल महत्त्वाचे खुलासे केले आहेत. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १७ मे रोजी मुंबईत होणार आहे.
पुस्तकाच्या १०२व्या पानावर राऊत लिहितात, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री पदासाठी विविध नावांची चर्चा होती. हसन मुश्रीफ उत्तम पर्याय ठरू शकले असते, पण त्यांचा मुस्लिम धर्म हेच त्यांच्या मार्गात अडथळा ठरले."
राऊत पुढे लिहितात की, "मुश्रीफ हे रांगडे, तगडे, पुरोगामी आणि शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते असून त्यांना गृहमंत्री करण्याची शक्यता होती. मात्र, धर्मामुळे टार्गेट होण्याची भीती पवारांना वाटली आणि शेवटी धर्म आडवा आला."
या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनीही याची दखल घेतली आहे.
"हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते, पण धर्म आडवा आला!" — संजय राऊत यांचे पुस्तकात मोठे विधान
|