विशेष बातम्या
हातकणंगले : टोप व कासारवाडीतील ३७ बेकायदेशीर क्रशरवर महसूल विभागाची कारवाई
By nisha patil - 10/7/2025 10:26:04 PM
Share This News:
हातकणंगले : टोप व कासारवाडीतील ३७ बेकायदेशीर क्रशरवर महसूल विभागाची कारवाई
हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या ३७ क्रशर व्यवसायांवर गुरुवारी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंडल अधिकारी सीमा मोरया व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एकूण ४६ क्रशरपैकी ३७ व्यावसायिकांकडे ट्रेडिंग लायसन्स, प्रदूषण परवाना आणि रॉयल्टीचे प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे हे क्रशर सील करण्यात आले. कारवाईदरम्यान अनेकांनी जेसीबी, डंपर यासारखी यंत्रसामग्री स्थलांतरित करून हालचाल सुरू केली होती.
– सीमा मोरया, मंडल अधिकारी
“परवाना नसलेल्या आणि रॉयल्टी न भरलेल्या व्यवसायांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.”
हातकणंगले : टोप व कासारवाडीतील ३७ बेकायदेशीर क्रशरवर महसूल विभागाची कारवाई
|