बातम्या

सेवा निवृत्त जवांनासाठी हयात दाखला मेळावा

Hayat Dhakram gathering for retired soldiers


By nisha patil - 11/20/2025 4:24:35 PM
Share This News:



सेवा निवृत्त जवांनासाठी हयात दाखला मेळावा
 

कोल्हापूर, दि. 20  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे PCDA नौदलातील अधिकारी मुंबई व त्यांची टीम येणार आहे.

जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांचा Digital Life Certificate (जीवन प्रमाणपत्र/हयातीचा दाखला) संदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधुन सेवानिवृत्त झालेले सैनिक, सेवानिवृत्त झालेले अधिकारी व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले. 


सेवा निवृत्त जवांनासाठी हयात दाखला मेळावा
Total Views: 36