बातम्या
•लग्नाला जायचा आणि चोरी करून यायचा.
By nisha patil - 4/17/2025 4:17:04 PM
Share This News:
•लग्नाला जायचा आणि चोरी करून यायचा.
•आदमापूरातील चोरट्याला अटक
लग्न समारंभात जाऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय. बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील असं आदमापूर इथं राहणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ३ लाख ७८ हजार 470 रुपयांचे 42 ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलीय.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या हेतूने गुन्हे शोध पथक काम करत होते. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना बाळासो उर्फ अजित पाटील या आरोपीला आदमापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याने कळंबा येथील जय पॅलेस व करवीर तालुक्यातील हणबरवाडी येथे असलेल्या सृष्टी फार्म हाऊस या मंगल कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी अधिक चौकशीत आरोपीवर लक्ष्मीपुरी, करवीर, आणि इस्पुरली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल होते ते उघडकीस आले. याशिवाय घरफोडी,जबरी चोरीची 21 गुन्हेही त्याच्यावर दाखल असून त्याला पुढील तपासासाठी लक्ष्मीपूरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने केली आहे.
•लग्नाला जायचा आणि चोरी करून यायचा.
|