बातम्या

भाऊ’ म्हणत ओळख वाढवली; काशीला नेऊन जबरदस्तीचे संबंध, नंतर २ लाखांची खंडणी

He was introduced by calling himself brother


By nisha patil - 11/28/2025 4:20:52 PM
Share This News:



भाऊ’ म्हणत ओळख वाढवली; काशीला नेऊन जबरदस्तीचे संबंध, नंतर २ लाखांची खंडणी


देवदर्शनावेळी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका महिलेने ४७ वर्षीय विवाहित पुरुषाला भावाचा दिखावा करून जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काशी विश्वनाथ येथे नेऊन त्याच्याकडून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून घेतल्याचा आरोप असून, त्यानंतर दोन लाख रुपयांची खंडणी मागत फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी चंदगड (कोल्हापूर) येथील पीडित व्यक्तीने कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, आरोपी गौरी प्रल्हाद वांजळे (वय ४२, रा. वनाज, पुणे) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ मार्च ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मार्च २०२५ मध्ये तुळजापूर येथे त्यांची ओळख झाली. त्यानंतर ‘भाऊ’ म्हणत जवळीक वाढवत तिने वारंवार जबरदस्तीने फिरवण्यास भाग पाडले. कोथरूड येथे बोलावून सोन्याची अंगठी देत लग्नाचा तगादा लावला. पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. “मी अशा प्रकारे अनेकांना फसवते, घाबरून लोक पैसे देतात,” असेही तिने पीडिताला धमकावले.

याच द्वेषातून तिने कोल्हापूरला जाऊन फिर्यादीच्या पत्नीशी फोनवरून शिवीगाळ केली. त्यानंतर दाम्पत्याने तिच्याकडील वस्तू परत करत कोणतेही संबंध ठेवू नका, असे स्पष्ट सांगितले. त्याचा राग धरून महिलेने फिर्यादीविरोधात खोटा अर्जही दिला. पोलिस चौकशीत संपूर्ण प्रकार उघड झाला.

कोथरूड पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल असून उपनिरीक्षक करिश्मा शेख पुढील तपास करीत आहेत.


भाऊ’ म्हणत ओळख वाढवली; काशीला नेऊन जबरदस्तीचे संबंध, नंतर २ लाखांची खंडणी
Total Views: 14