बातम्या

आजरा साखर कारखान्यास साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ विभाग प्रमुख यांची भेट

Head of Finance Department of Sugar Commissioner


By Administrator - 1/17/2026 5:08:12 PM
Share This News:



आजरा साखर कारखान्यास साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ विभाग प्रमुख यांची भेट
 

आजरा (हसन तकीलदार )*:-गतवर्षीं वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यांस एन.सी.डी.सी.या वित्तीय संस्थेकडून रू.12268.00 लाख इतके दिर्घ मुदतीचे कर्ज मिळालेले आहे. सदर कर्जाचा विनियोग व वसुली बाबतची माहिती घेणे व तपासणी करणेकामी साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ विभाग प्रमुख यशवंत गिरीसाहेब (संचालक अर्थ) यांनी प्रत्यक्ष कारखाना कार्यालयास भेट दिली.

यावेठी त्यांचे सोबत विशेष लेखापरिक्षक आर.बी.वाघ, भोसलेसाहेब, धुमाळसाहेब उपस्थित होते. आजरा साखर कारखान्याने एन.सी.डी.सी.या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या रू.12268.00 लाख इतक्या कर्जाचा विनियोग व तपासणी केले नंतर गिरीसाहेब यांनी समाधान व्यक्त केले.

त्याचबरोबर आजरा कारखान्याने एन.सी.डी.सी. कडून घेतलेल्या कर्जाचे दरमहा होणारे संपुर्ण व्याज नियमीत परतफेड केले असून कर्जाबाबतचे सर्व कागदोपत्री रेकॉर्ड सुव्यवस्थित ठेवलेले आहे.  कर्जाच्या पुढील नियोजनाबाबत अर्थ विभाग प्रमुखांनी कारखान्यास मौलिक मार्गदर्शन व सुचना केल्या.

यावेळी कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई तसेच व्हा.चेअरमन सुभाष गणपतराव देसाई, संचालक अनिल फडके, गोविंद पाटील, कार्यकारी संचालक एस.के.सावंत, चिफ अकौटंट प्रकाश चव्हाण, डे.चिफ अकौटंट रमेश वांगणेकर आदिजण उपस्थित होते.


आजरा साखर कारखान्यास साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ विभाग प्रमुख यांची भेट
Total Views: 23