बातम्या

स्व. नंदकुमार मोरे (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराला प्रतिसाद; १२५ जणांचे रक्तदान!

Health camp held on the occasion


By nisha patil - 10/24/2026 10:32:53 PM
Share This News:



स्व. नंदकुमार मोरे (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराला प्रतिसाद; १२५ जणांचे रक्तदान!

सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने स्व. नंदकुमार मोरे (आण्णा) फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद मिळाला. ‘लोकसेवेचा वसा, आरोग्याची नवी दिशा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात रक्तदानासह नेत्रतपासणी, प्राथमिक आरोग्य तपासणी आणि कॅन्सर तपासणी करण्यात आली.

या शिबिरात १२५ जणांनी रक्तदान केले. तसेच १६० जणांची नेत्रतपासणी, १२८ जणांची प्राथमिक आरोग्य तपासणी आणि ३४ जणांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. विविध आरोग्य तपासण्यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमासाठी कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटल, स्वप्नील आय अँड लेझर सेंटर, राजर्षी शाहू ब्लड बँक आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आपला दवाखाना या आरोग्य संस्थांचे सहकार्य लाभले.

स्व. नंदकुमार मोरे (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा हा उपक्रम राबविण्यात आला. रक्तदानातून गरजू रुग्णांना मदत मिळण्याबरोबरच आरोग्य तपासणीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात आला.

समाजसेवेचा वारसा जपत आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या या उपक्रमातून स्व. नंदकुमार मोरे (आण्णा) यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.


स्व. नंदकुमार मोरे (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराला प्रतिसाद; १२५ जणांचे रक्तदान!
Total Views: 12