बातम्या
आजरा साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणी मजूर व महीलांची आरोग्य तपासणी व सॅनिटरी नॅपकीनचे वाटप
By nisha patil - 11/22/2025 3:24:20 PM
Share This News:
आजरा साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणी मजूर व महीलांची आरोग्य तपासणी व सॅनिटरी नॅपकीनचे वाटप
आजरा (हसन तकीलदार):- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामात ऊस तोडणी करीता आलेल्या परजिल्ह्यातील महीला व मजूरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून या महीला मजूर व त्यांच्या मुलींसाठी कारखान्याने सॅनिटरी नॅपकीन स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहेत.
आणि हे सॅनिटरी नॅपकिन ऊसाच्या फडापर्यंत पोहच केले जात आहेत.त्याचप्रमाणे ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणीही केली जात आहे त्याचअनुषंगाने शुक्रवारी गजरगांव ता. आजरा येथे ऊस तोडणी मजूर व महीलांची आरोग्य तपासणी करिता आरोग्य शिबीर आयोजित करून त्यामध्ये जवळ जवळ १२८ ऊस तोडमजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर मजूर महिलांना व त्यांच्या मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटपाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे संचालक अनिल फडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.जी. गुरव, ग्रामसेवक अजितसिंह किल्लेदार, आरोग्य विभाग स्टाफ, मुख्यशेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई,शेती विभाग मुख्य लिपिक संदीप कांबळे, बाळू पाटील, कुमार चिमणे व अन्य स्टाफ त्याचबरोबर ऊस तोडणी मजूर महीला उपस्थित होत्या.
आजरा साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणी मजूर व महीलांची आरोग्य तपासणी व सॅनिटरी नॅपकीनचे वाटप
|