बातम्या

*प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीच्या वतीने विटे ता. आजरा येथे आरोग्य तपासणी शिबिर

Health check up camp organized by Primary Health Centre


By nisha patil - 9/21/2026 11:24:24 PM
Share This News:



*प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीच्या वतीने विटे ता. आजरा येथे आरोग्य तपासणी शिबिर

142 नागरिकांची आरोग्य तपासणी

*आजरा(हसन तकीलदार)*:- आजरा तालुक्यातील विटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि न्यू जय शिवराय गणेश मंडळ, विटे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणेत आले होते. या शिबिराला नगरिकांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
       

पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा पोवार व विटेच्या सरपंच जोती चव्हाण यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी यांच्या वतीने व न्यू जय शिवराय गणेश मंडळ, विटे यांच्या सहकार्याने गणेशोत्सवानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.‘माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’, ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आणि ‘तीशीचा पल्ला, तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल 142 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 82 जणांची रक्त तपासणी व 27 जणांचा ई.सी.जी. करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव व डॉ. तनवर कुमार यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. रक्तदाब, रक्तातील साखर व इतर आवश्यक आरोग्य तपासण्यांसह नागरिकांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

वाढत्या असंसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर उच्च रक्तदाब व मधुमेहाचे वेळीच निदान तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. विशेषतः वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगीचे आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांची नोंदणी, विविध तपासण्या व आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. न्यू जय शिवराय गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.


*प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीच्या वतीने विटे ता. आजरा येथे आरोग्य तपासणी शिबिर
Total Views: 11