बातम्या
आरोग्य हि महान संपत्ती सरपंच स्नेहा पाटील
By nisha patil - 9/24/2025 6:14:54 PM
Share This News:
आरोग्य हि महान संपत्ती सरपंच स्नेहा पाटील
किशोर जासूद भादोले :जीवन सुरळीत व्हावे यासाठी आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे . आरोग्यही महान संपत्ती आहे . त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असे प्रतिपादन सरपंच स्नेहा पाटील यानी केले
प्राथमिक आरोग्य केंद्र भादोले येथे स्वस्थ नारी सक्षम परिवार अभियाना मार्फत महिलांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते . त्या वेळी बोलत होत्या . अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य अधिकारी अनिकेत खराडे होते . यावेळी २० प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या . यावेळी ३०० महिलांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला .
यावेळी ग्रामसेविका आसमा .मुल्लानी , डॉ .विजय खुपरेकर , डॉ . मृणाल खिलारे, डॉ स्नेहल धुमाळ डॉ . युवराज कोळी , डॉ . तानाजी चव्हाण यावेळी सुत्रसंचालन संतोष लोंढे आभार आर एस पाटील यानी मानले .
आरोग्य हि महान संपत्ती सरपंच स्नेहा पाटील
|