बातम्या
राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे.....
By nisha patil - 9/25/2025 12:14:44 PM
Share This News:
राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे.....
वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
मुंबई, : अतिवृष्टीमुळे राज्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
मुंबईत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या दालनात ही बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धिरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, संचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुष संचालक डॉ. रमण घुंगराळेकर आदी उपस्थित होते.
आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व यंत्रणांनी तत्परतेने पुरग्रस्त भागात सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगून मंत्री मुश्रिफ म्हणाले की, पूरग्रस्त भागात औषधांचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही आणि आवश्यक ती सर्व औषधे उपलब्ध असल्याबाबत खबरदारी घ्यावी. पूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा विचार करून सर्व यंत्रणांनी नियोजन करावे. डास प्रसिबंधक फवारणी करावी. साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. आपतकालीन परिस्थितीमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णांसाठी सर्व सुविधा तत्पर ठेवाव्यात. रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवाव्यात, असे आदेश मंत्री मुश्रिफ यांनी बैठकीत दिले.
राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे.....
|