बातम्या

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

Health workers honored on the occasion of Babasaheb Ambedkar Jayanti


By nisha patil - 4/17/2025 4:19:46 PM
Share This News:



बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

आपचे विजय हेगडे यांच्याकडून तीनचाकी सायकल भेट

 स्वच्छतेच्या शिल्पकारांचा सन्मान!

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सदरबाजार परिसरातील विचारे माळ येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते महानगरपालिका आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान.

आप आम आदमी पार्टीचे शहर संघटक विजय हेगडे यांच्या पुढाकारातून आणि स्वखर्चातून सफाई कामगारांना तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. तसेच त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. हा उपक्रम सामाजिक कृतज्ञतेचे एक उत्तम उदाहरण ठरला.

या कार्यक्रमास समाज मंदिराचे अध्यक्ष अमर हेगडे, सतीश माने, राहुल तलवारे, दाविद चौगुले, लखन मोहिते, सदाशिव मिस्त्री, सचिन शेटे, उदय कांबळे, नितीन कांबळे, भोला पवार, अमर गडकरी, अक्षय माळगे, तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून बाबासाहेबांच्या विचारांना चालना देणारा सामाजिक आदर व्यक्त करण्यात आला, आणि स्वच्छतेच्या शिल्पकारांना दिलेली ही मान्यता समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारी ठरली.


बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव
Total Views: 82