बातम्या
भुदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस; वेदगंगा नदीची पाणी पातळी वाढली
By nisha patil - 8/19/2025 6:17:11 PM
Share This News:
भुदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस; वेदगंगा नदीची पाणी पातळी वाढली
भुदरगड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून पाटगाव धरण (श्री मौनीसागर जलाशय) ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून ४०६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून वेदगंगा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात तब्बल १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर यंदाच्या हंगामात पावसाचे एकूण प्रमाण ४९१२ मिमीपर्यंत पोहोचले आहे.
पावसामुळे आणि विसर्गामुळे नदीवरील गारगोटी, शेणगाव, ममदापूर, निळपण, वाघापूर, म्हसवे तसेच कागल तालुक्यातील कुरणी, चिखली, बस्तवडे, सुरुपली येथील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीच्या काठावरील शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
भुदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस; वेदगंगा नदीची पाणी पातळी वाढली
|