विशेष बातम्या
कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
By nisha patil - 12/6/2025 8:52:13 PM
Share This News:
कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
शाहूपुरीत वीज कोसळली, सखल भागांत पाणी साचले
हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार कोल्हापुरात गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या तडाख्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले
शहरातील शाहूपुरी परिसरात वीज कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हीनस कॉर्नर, कसबा बावडा आणि इतर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हवामान खात्याने पुढील २४ तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच पाण्याने भरलेल्या भागांपासून दूर राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
|