विशेष बातम्या

कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; शेती आणि उद्योगांचे मोठे नुकसान

Heavy rains hit Kolhapur

By nisha patil - 5/21/2025 1:26:15 PM
Share This News:

कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; शेती आणि उद्योगांचे मोठे नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यात  काल  वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. राधानगरी, चंदगड, गगनबावडा, इचलकरंजीसह अनेक तालुक्यांत दीड तासांहून अधिक वेळ जोरदार पावसाने झोडपले. भुईमूग व सूर्यफुलाची काढणी सुरू असताना आलेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. 

शिरोली एमआयडीसीसह विविध औद्योगिक वसाहतींतील वीजपुरवठा खंडित झाल्याने उत्पादन ठप्प झाले आणि उद्योगधंद्यांना आर्थिक फटका बसला. अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे पुणे-बंगळूर महामार्ग व बाजारपेठांमध्ये पाणी साचून वाहतूक व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; शेती आणि उद्योगांचे मोठे नुकसान
Total Views: 84