बातम्या

कोल्हापुरात पावसाची उघडझाप; पंचगंगेची पातळी २६ फुटांवर

Heavy rains in Kolhapur


By nisha patil - 8/26/2025 5:43:24 PM
Share This News:



 कोल्हापुरात पावसाची उघडझाप; पंचगंगेची पातळी २६ फुटांवर

जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणातील विसर्गही घटला आहे. यामुळे पंचगंगा नदीची पातळी सोमवारी २९.१० फुटांवरून सायंकाळपर्यंत २६ फुटांवर खाली आली. दिवसभरात तब्बल बारा बंधारे पाण्याखालून मोकळे झाले.

गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. सोमवारी सकाळी ऊन पडले असले तरी दुपारी ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सध्या राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १५००, दूधगंगा धरणातून १६००, तर वारणातून ४७३६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ३७ मार्गांवर अजूनही पाणी असल्याने वाहतूक बंद आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.९ मिमी पावसाची नोंद झाली असून, गगनबावड्यात सर्वाधिक ७.७ मिमी पाऊस झाला. याशिवाय दहा खासगी मालमत्तांची पडझड होऊन सुमारे तीन लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.


कोल्हापुरात पावसाची उघडझाप; पंचगंगेची पातळी २६ फुटांवर
Total Views: 51