प्रजासत्ताक दिनी आरटीओ कोल्हापूरतर्फे हेल्मेट जनजागृती रॅली व रक्तदान शिबीर
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व कोल्हापूर बाईकिंग कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सर्व वाहनधारक, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना, वाहन वितरक संघटना, सर्व रिक्षा संघटना यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत हेल्मेट जनजागृती व रक्तदान शिबीर सोमवार, 26 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिली आहे.
हेल्मेट जनजागृती रॅलीद्वारे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करणे तसेच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. या रॅलीस सर्वांनी हेल्मेट घालून उपस्थित रहावे तसेच रक्तदान करून या सामाजिक कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.