बातम्या
वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा मदतीचा हात
By nisha patil - 10/22/2026 6:33:26 PM
Share This News:
वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा मदतीचा हात
फाउंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन
म्हाकवे, दि. २२: म्हाकवे ता. कागल येथील कु. रणजित सिद्राम पाटील या अवघ्या २८ वर्षे वयाच्या शेतकऱ्याच्या मुलाचा चार दिवसांपूर्वीच वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. म्हाकवे येथे पोहोचत गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. संकटग्रस्त पाटील कुटुंबीयांना श्री. मुश्रीफ यांनी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला.
यावेळी वडील सिद्राम मारूती पाटील यांनी आपल्या डोळ्यांसमोरच घडलेली दुर्घटनेची हकीकत शब्दशः सांगितली. हे ऐकून सारेच उपस्थित भावुक झाले. श्री. मुश्रीफ म्हणाले, कर्त्या मुलाच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे या कुटुंबाला लागेल ते सहकार्य करू.
हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा.......!
श्री. मुश्रीफ सांत्वनपर भेटीसाठी गेले असता त्यांनी वडील सिद्राम मारुती पाटील, आई सौ. आक्काताई सिद्राम पाटील, दोन विवाहित बहिणी यांची भेट घेऊन सांत्वन केली व त्यांना धीर दिला. त्यावेळी कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.
यावेळी वडील सिद्राम मारूती पाटील, आई सौ. आक्काताई सिद्राम पाटील, चुलते आनंदा मारुती पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, जी .एस .पाटील, एस. के. पाटील, हिंदुराव पाटील निवास पाटील, विजय पाटील, अशोक पाटील, ओमप्रकाश पाटील, पवन पाटील, आदिनाथ पाटील, शंकर पाटील, चंद्रकांत चौगुले, बंडोपंत ठिपकुर्ले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा मदतीचा हात
|