बातम्या

तिच्या सावलीने चंद्र झाकोळला.

Her shadow obscured the moon


By nisha patil - 8/9/2025 11:43:59 AM
Share This News:



तिच्या सावलीने चंद्र झाकोळला.

खग्रास चंद्रग्रहणाचा लाभ कोल्हापूर वासियांनी घेतला.

कोल्हापूर, ता. ७: सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येऊन पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्र झाकला जातो. यालाच खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. आज रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात झाली. पहाटे एक वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण पूर्ण झाले. भारतासह आफ्रिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथेही हे ग्रहण दिसले. शहरात काही खगोल अभ्यासकांनी विद्यार्थी आणि नागरिकांना दुर्बिणीतून ग्रहण प्रत्यक्ष दाखवले आणि त्याची माहिती दिली. अंबाबाई मंदिरातही देवीच्या उत्सवमूर्तीला अखंड जलाभिषेकआला.
आजचा दिवस आकाश निरीक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला. भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोपातील लोकांनी २०२२ नंतरचे सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण अनुभवले. विज्ञानप्रेमींसाठी

ही एक पर्वणी ठरली, कारण हे संपूर्ण ग्रहण नुसत्या डोळ्यांनी सहज दिसले. ग्रहणाची सुरुवात संध्याकाळी ८.५८ वाजता झाली, जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या विरळ छायेत प्रवेश केला. त्यानंतर ९.५७
वाजता चंद्र गडद छायेत शिरताच डाव्या कडेकडून चंद्रबिंब झाकले जाऊ लागले. ही स्थिती खंडग्रास अवस्था म्हणून ओळखली जाते. हळूहळू सावली पुढे सरकत गेली आणि ११.०० वाजता संपूर्ण चंद्रबिंब झाकले गेले. याला खग्रास अवस्था असे म्हटले जाते. तब्बल १ तास २२ मिनिटे म्हणजे १२.२२ वाजेपर्यंत चंद्र या खग्रास अवस्थेत होता.
या काळात आकाशातील दृश्य केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर कलात्मक नजरेतूनही थक्क करणारे होते. गडद लालसर छटा असलेला चंद्र दिसतो. त्यामुळे याला ब्लड मून किंवा रेड मून असेही म्हटले जाते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.

 


तिच्या सावलीने चंद्र झाकोळला.
Total Views: 108