बातम्या

हेरवाडच्या अमृता पाटीलची मल्लखांब स्पर्धेत भरारी!

Herwads Amruta Patil Soars in Mallakhamb Competition


By nisha patil - 11/10/2026 7:20:40 PM
Share This News:



हेरवाडच्या अमृता पाटीलची मल्लखांब स्पर्धेत भरारी!
 

जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

शिरोळ प्रतिनिधी : आचिन हेरवाडे हेरवाड येथील कन्या विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी कु. अमृता अरविंद पाटील हिने जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
 

कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर शाळेने प्रथमच सहभाग नोंदवत यश संपादन केले. अमृताला मल्लखांब प्रशिक्षक संजय देबाजे, सौ. अश्विनी देबाजे व क्रीडाशिक्षक दिलीप शिरढोणे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी अभिनंदन केले.


हेरवाडच्या अमृता पाटीलची मल्लखांब स्पर्धेत भरारी!
Total Views: 46