बातम्या

हेरवाडच्या लेकींची कबड्डीत गगनभरारी;  शिरढोणे सरांकडून स्पोर्ट्स शूज देऊन अनोखा गौरव

Herwads daughters soar high in Kabaddi


By nisha patil - 8/10/2026 11:39:24 PM
Share This News:



हेरवाडच्या लेकींची कबड्डीत गगनभरारी;  शिरढोणे सरांकडून स्पोर्ट्स शूज देऊन अनोखा गौरव
 

हेरवाड : प्रतिनिधी : आचिन हेरवाडेशालेय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच हेरवाड गावच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशस्वी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप देत सामाजिक बांधीलकी जपणारे दिलीप शिरढोणे सर यांनी स्वखर्चातून सर्व खेळाडूंना स्पोर्ट्स शूज भेट देत त्यांचा अनोख्या पद्धतीने गौरव केला.
 

या कौतुक सोहळ्यात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली कु. श्वेता मनोहर धामणे हिच्यासह विभागीय स्तरावर निवड झालेल्या कु. ऋतुजा राहुल बरगाले, कु. देवयानी किरण नेर्ले, कु. उत्कर्षा मनोहर धामणे आणि कु. सृष्टी शशिकांत धामणे या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
 

खेळाडूंना यशाची दिशा दाखविणारे प्रशिक्षक रमेश डोंगरे व संतोष चिंदरकर यांचाही यावेळी यथोचित गौरव करण्यात आला.
 

खेळाडूंची खरी गरज ओळखून केवळ सत्कारापुरते मर्यादित न राहता त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी उपयुक्त ठरणारे स्पोर्ट्स शूज देण्याचा उपक्रम शिरढोणे सरांनी राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे खेळाडू, पालक व मार्गदर्शकांनी मनापासून स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपसरपंच सौ. छाया सूर्यवंशी व मुख्याध्यापक सुभाष तराळ यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
खेळाडूंच्या यशाला प्रोत्साहन आणि सामाजिक बांधीलकीची जोड देणारा हा उपक्रम ....


हेरवाडच्या लेकींची कबड्डीत गगनभरारी;  शिरढोणे सरांकडून स्पोर्ट्स शूज देऊन अनोखा गौरव
Total Views: 6