बातम्या
भाजपच्या नगरपालिकांच्या उमेदवार निवडीसाठी कोल्हापुरात उच्चस्तरीय बैठक
By nisha patil - 11/14/2025 4:54:02 PM
Share This News:
भाजपच्या नगरपालिकांच्या उमेदवार निवडीसाठी कोल्हापुरात उच्चस्तरीय बैठक
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिकांसाठी उमेदवार निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, तसेच भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत संजय बाबा घाडगे, राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, शिवाजी बुवा यांच्यासह संबंधित नगरपालिकांतील प्रमुख नेतेमंडळी सहभागी झाले.
पक्षाच्या रणनीती, स्थानिक समीकरणे व उमेदवारांची निवड प्रक्रिया यावर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
भाजपच्या नगरपालिकांच्या उमेदवार निवडीसाठी कोल्हापुरात उच्चस्तरीय बैठक
|