शैक्षणिक
विवेकानंदमध्ये हिंदी दिवस संपन्न
By nisha patil - 9/24/2025 4:58:09 PM
Share This News:
विवेकानंदमध्ये हिंदी दिवस संपन्न
कोल्हापूर, दि. 24: स्वातंत्रता आंदोलनमध्ये हिंदी साहित्यकारांनी मिळून योगदान दिले आहे. साहित्य जगण्याची प्रेरणा देते, लढण्यास शिकवते, जगण्याच बळ देतं. साहित्यातूनच व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो. भाषेमुळेच व्यक्तीचे व्यक्तीमत्वाचा ठसा उमटतो. म्हणून भाषेचा वापर विचार करुन करावा. हिंदी भाषा - साहित्य माणसाला माणूस बनविण्याचे काम करते. असे मत विजयसिंह यादव कॉलेजचे हिंदी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) नाजिम शेख यांनी व्यक्त केले.
ते विवेकानंद कॉलेजच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित हिंदी सप्ताह समारोप समारंभाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते. प्रा. (डॉ.) नाजिम शेख पुढे म्हणाले की, भाषा ही एक असे माध्यम आहे की ज्यामुळे मनुष्य आपले विचार, आपली भावना दूसयांसमोर व्यक्त करु शकतो. भाषेचा वापर करताना काळजीपूर्वक करावा. विद्यार्थ्यांनी भाषेचा बारकाइने अभ्यास केला पाहिजे. व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ही त्याच्या भाषेतूनच होत असते. भाषेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत.
अध्यक्षीय भषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार Eg.kkys dh] सगळयांनी मिळून काम केले पाहिजे. भाषेच्या जडणघडणीसाठी काम केले पाहिजे. प्रत्येकाने आपआपल्या भाषेवर काम केले पाहिजे. जर भाषेवर मेहनत केली तर भाषेतील रोजगाराच्या अनेकानेक संधी उपलब्ध होतात. त्यासाठी आत्मविश्वासपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे यश नक्की मिळते. व्यक्तीची ओळख ही त्याच्या व्यक्तिमत्वासोबत भाषेमुळेच होत असते. भाषेमुळेच व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटत असतो. मग ती कोणतीही भाषा असो. हिंदी भाषेमध्ये माधुर्य आणि गोडवा आहे. ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपणास अनेक भाषा येणे गरजेचे आहे.
हिंदी सप्ताहामध्ये निबंध स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, समीक्षा लेखन स्पर्धा, विज्ञापन स्पर्धा आदि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत सानिका सातगोंडा पाटिल, (बी. कॉम. भाग तीन) हीला प्रथम, नजिया राकेश नदाफ, (बी.ए. भाग दोन) हीला प्रथम, महेक इमरान मुलाणी, (बी.ए. भाग दोन) हीला द्वितीय, जिनत फारूख शेख, (बी. कॉम. भाग एक) हीला द्वितीय, रिफा झहिरअब्बास मुल्ला, (बी. ए. भाग एक) - तृतीय, सिफा झहिरअब्बास मुल्ला (बी.ए. भाग एक) हीला तृतीय क्रमांक मिळाला. काव्यवाचन स्पर्धेत देवेंद्र दत्तात्रय सूर्यवंशी (बी. व्होक. भाग दो) प्रथम, महेक इमरान मुलाणी (बी.ए. भाग दो) द्वितीय, नजिया राकेश नदाफ (बी.ए. भाग दोन) तृतीय, क्रमांक मिळाला. समीक्षा लेखन स्पर्धेत नजिया राकेश नदाफ (बी.ए. भाग दोन) प्रथम, महेक इमरान मुल्लाणी (बी.ए. भाग दोन) द्वितीय, स्वाती दीपक हिंगोले (बी.ए. भाग दोन)-तृतीय, अलताफ अब्दुलगणी पटेल (बी.ए. भाग दो) उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. विज्ञापन स्पर्धेत दिपाली कृष्णा खुटाले, (बी.ए. भाग तीन) प्रथम, तृप्ती मानाजी सावंत, (बी. एस्सी. भाग तीन) द्वितीय, रिफा झहिरअब्बास मुल्ला, (बी.ए. भाग एक) तृतीय, महेक इमरान मुल्ला (बी.ए. भाग दोन) उत्तेजनार्थ, लक्ष्मी मोहन सुतार, (बी. कॉम. भाग एक) उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. आरिफ महात यांनी केले. आभार हिंदी विभाग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. दीपक तुपे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ए. भाग दोनची विद्यार्थिनी नाझिया नदाफ हीने केले. कार्यक्रमात कनिष्ठ हिंदी विभागप्रमुख प्रा. विश्वंभर कुलकर्णी, विद्यार्थी - विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंदमध्ये हिंदी दिवस संपन्न
|