बातम्या
विवेकानंदमध्ये हिंदी दिवस संपन्न
By nisha patil - 9/24/2026 7:24:03 PM
Share This News:
हिंदी भाषेत करियच्या अनेक संधी श्री प्रविण चिपळुणकर, कार्यक्रम अधिकारी, कोल्हापूर आकाशवाणी
विवेकानंदमध्ये हिंदी दिवस संपन्न
कोल्हापूर, दि. 24: भाषेशिवाय मनुष्य व्यक्त होवू शकत नाही. साहित्यातील कोणताही वाड्मय प्रकार भाषेशिवाय अभिव्यक्त करता येत नाही. सर्व शब्द प्रभावशाली असत नाहीत. त्यासाठी शब्दांची योग्य निवड करण्यास शिका व आपल्या मनातील भाव लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करायला शिका. असे मत कोल्हापूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी श्री प्रविण चिपळुणकर यांनी व्यक्त केले. ते विवेकानंद कॉलेजच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित हिंदी सप्ताह समारोप समारंभाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ आळवेकर हे होते.
श्री प्रविण चिपळुणकर पुढे म्हणाले की, भाषा ही एक असे माध्यम आहे की ज्यामुळे मनुष्य आपले विचार, आपली भावना दुसऱ्यांसमोर व्यक्त करु शकतो. भाषेचा वापर करताना काळजीपूर्वक करावा. विद्यार्थ्यांनी भाषेचा बारकाइने अभ्यास केला पाहिजे. व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ही त्याच्या भाषेतूनच होत असते. सर्व प्रकारचे लेखन करियचे माध्यम होवू शकते. भाषेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत.
अध्यक्षीय भषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ आळवेकर म्हणाले की, सगळयांनी मिळून भाषेच्या जडणघडणीसाठी काम केले पाहिजे. प्रत्येकाने आपआपल्या भाषेवर काम केले पाहिजे. जर भाषेवर मेहनत केली तर भाषेतील रोजगाराच्या अनेकानेक संधी उपलब्ध होतात. त्यासाठी आत्मविश्वासपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे यश नक्की मिळते. व्यक्तीची ओळख ही त्याच्या व्यक्तिमत्वासोबत भाषेमुळेच होत असते. भाषेमुळेच व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटत असतो. मग ती कोणतीही भाषा असो. हिंदी भाषेमध्ये माधुर्य आणि गोडवा आहे. ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपणास अनेक भाषा येणे गरजेचे आहे.
हिंदी सप्ताहामध्ये निबंध स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, समीक्षा लेखन स्पर्धा, विज्ञापन स्पर्धा आदि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत अपेक्षा जनार्दन शिंदे, (बी. एस्सी. भाग दोन) हीला प्रथम, रिफा झहिरअब्बास मुल्ला, (बी.ए. भाग दोन) हीला द्वितीय, श्रद्धा बाबाजी कांबळे, (बी. एस्सी. भाग दोन) हीला तृतीय, जिनत फारूख शेख, (बी. कॉम. भाग दोन) हीला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. काव्यवाचन स्पर्धेत रिफा झहिरअब्बास मुल्ला (बी. ए. भाग दोन) प्रथम, जिनत फारूख शेख, (बी. कॉम. भाग दोन) द्वितीय, सिफा झहिरअब्बास मुल्ला (बी.ए. भाग दोन) तृतीय, आदिती अभिजीत असवडे हीला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
समीक्षा लेखन स्पर्धेत नजिया राकेश नदाफ (बी.ए. भाग तीन) प्रथम, सिफा झहिरअब्बास मुल्ला (बी.ए. भाग दोन) द्वितीय, रिफा झहिरअब्बास मुल्ला (बी.ए. भाग दोन)- द्वितीय, सृष्टि सतीश लांडगे (बी.ए. भाग एक) तृतीय क्रमांक मिळाला. विज्ञापन/ पोस्टर मेकिंग स्पर्धेत विशाखा अनिल कांबळे, (बी.ए. भाग दोन) प्रथम नाजिया राकेश नदाफ, (बी. ए. भाग तीन) द्वितीय, अस्मिता बाबासाहेब जठार, (बी.ए. भाग दो) तृतीय, रिफा झहिरअब्बास मुल्ला (बी.ए. भाग दोन) उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचे प्रोत्साहन लाभले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. आरिफ महात यांनी केले. आभार हिंदी विभाग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. दीपक तुपे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ए. भाग तीनची विद्यार्थींनी महेक इमरान मुलाणी व बी. ए. भाग दोनची विद्यार्थींनी रिफा झहिरअब्बास मुल्ला यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थी - विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंदमध्ये हिंदी दिवस संपन्न
|