विशेष बातम्या
‘कोल्हापूर’ सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीची महत्त्वपूर्ण मागणी
By nisha patil - 7/11/2025 3:29:24 PM
Share This News:
‘कोल्हापूर’ सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीची महत्त्वपूर्ण मागणी
कुस्तीपटू व जिम प्रशिक्षकांची ओळख पडताळणी अनिवार्य करण्याची मागणी..
कोंबिंग ऑपरेशनचीही मागणी
कोल्हापूर ही ऐतिहासिकदृष्ट्या ‘कुस्तीची पंढरी’ म्हणून ओळखली जाते. देशभरातून असंख्य कुस्तीपटू आणि जिम प्रशिक्षक येथे सरावासाठी येतात. मात्र, अलीकडेच “महाराष्ट्र केसरी” विजेता सिकंदर शेख यांना पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात कुस्तीपटू व जिम प्रशिक्षकांची ओळख (Identification) व तपासणी प्रक्रिया पोलीस खात्यामार्फत अनिवार्य करण्याची आणि संशयास्पद तसेच कुख्यात व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी “कोंबिंग ऑपरेशन्स” हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘कोल्हापूर’ सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीची महत्त्वपूर्ण मागणी
|