बातम्या

पाकिस्तानविरोधात हिंदू महासभा महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

Hindu Mahasabha Womens Front strong protest against Pakistan


By nisha patil - 4/28/2025 8:03:22 PM
Share This News:



पाकिस्तानविरोधात हिंदू महासभा महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

कोल्हापूर (२७ एप्रिल) – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करत अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीने शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र आंदोलन केले. पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे पायदळी तुडवत व चप्पलांचा मार करत निषेध व्यक्त करण्यात आला.
 

"भारत माता की जय" आणि "पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशातून काढा" अशा घोषणा देत परिसर दणाणला.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संदीप सासने व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. स्वाती रजपूत यांनी केले. शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.


पाकिस्तानविरोधात हिंदू महासभा महिला आघाडीचे तीव्र आंदोलन
Total Views: 107