विशेष बातम्या
हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन — वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By nisha patil - 5/11/2025 4:31:36 PM
Share This News:
हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन — वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर लंडनमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे.
गोपीचंद हिंदुजा हे हिंदुजा कुटुंबातील दुसऱ्या पिढीतील प्रमुख सदस्य असून व्यावसायिक जगतात "जीपी" या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुले संजय आणि धीरज, तसेच मुलगी रिता असा परिवार आहे.
हिंदुजा बंधूंनी स्थापलेला हा उद्योगसमूह जगभरात बँकिंग, ऑटोमोबाईल, ऊर्जा, आयटी आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. गोपीचंद हिंदुजा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे
हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन — वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
|