विशेष बातम्या
इतर राज्यात मराठी तरुणांवर असा अन्याय झाला तर...हिंदुस्तानी भाऊचा सवाल
By nisha patil - 7/7/2025 2:03:52 PM
Share This News:
इतर राज्यात मराठी तरुणांवर असा अन्याय झाला तर...हिंदुस्तानी भाऊचा सवाल
मुंबई : मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंट मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरणारा हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास फाटक याने एक भावनिक व्हिडीओ शेअर करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना थेट उद्देशून कठोर सवाल केले आहेत.
“मराठी भाषा हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, गर्व आहे. पण त्याच भाषेच्या नावाखाली आपल्या हिंदू बांधवांना मारहाण करणे चुकीचे आहे.”त्याने स्पष्ट केलं की, शिक्षण संस्थांमध्ये मराठी शिकवण्याची भूमिका योग्य आहे, मात्र एखाद्याला मारून आपण हिंदुत्वापासून दूर जात आहोत.“जर आपल्या मराठी तरुणांवर इतर राज्यांत असाच अन्याय झाला तर आपल्याला चालेल का?” असा सवाल करत त्याने एकत्रितपणावर भर दिला.भाऊने पुढे राज ठाकरे यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावर आधारित असल्याचे सांगत, काँग्रेससोबत बसल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला. “ते पण हिंदू आहेत. हिंदू बांधवांवर हल्ला करणे हे हिंदुत्व नाही. तुमच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत, त्या मोडू नका.”
सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, हिंदुस्तानी भाऊचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून सामाजिक एकतेबाबत नवा विचारमंथन सुरू झाला आहे.
इतर राज्यात मराठी तरुणांवर असा अन्याय झाला तर...हिंदुस्तानी भाऊचा सवाल
|