बातम्या

पत्रमहर्षी, पुढारीकर, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांचा ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा

Historic Sahastra Chandradarshan ceremony


By nisha patil - 5/11/2025 11:31:26 AM
Share This News:



कोल्हापूर, दि. ४:- आक्रमक पत्रकारितेला विकासाची जोड देत मराठी पत्रकारितेत वैभवशाली इतिहास घडविणाऱ्या "पुढारीकर" पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव यांचा उद्या कोल्हापुरात दि. ५ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा होत आहे.

सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील डिजिटल पत्रकारांच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पुढारी कार्यालयात पद्मश्री डॉ. जाधव यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत तेजस राऊत, उद्योजक उन्मेश साठे हेही उपस्थित होते. 
यावेळी डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या समवेत गप्पाही झाल्या.

राजा माने यांनी पुढारीच्या पुणे आणि अहिल्यांनगर (अहमदनगर)आवृत्यांचे कार्यकारी संपादकपद सांभाळले होते. तसेच त्यांच्या "ज्यांनी आभाळ कवेत घेतले.." या पुस्तकातही राज्यातील एक महनीय व्यक्तिमत्व म्हणून समावेश होता. यामुळे पुढारी परिवाराशी राजा माने यांचे विशेष ऋणानुबंध आहेत. सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असलेल्या पुढारी मध्यम समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेशदादा जाधव यांचीही राजा माने यांनी सदिच्छा भेट घेतली.


पत्रमहर्षी, पुढारीकर, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांचा ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
Total Views: 74