बातम्या

कोल्हापुरात हापूसचा ऐतिहासिक लिलाव!

Historic auction of Hapus in Kolhapur


By nisha patil - 11/17/2026 3:40:08 PM
Share This News:



कोल्हापुरात हापूसचा ऐतिहासिक लिलाव!
 

कोल्हापूरच्या बाजार समितीत रत्नागिरी हापूस आंब्याने हंगामाच्या पहिल्याच लिलावात अक्षरशः धमाका केला आहे! हापूस आंब्याच्या एका पेटीला तब्बल ५५ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाल्याने संपूर्ण बाजारपेठेत या लिलावाची जोरदार चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, ही पेटी ५ डझनची नसून तब्बल ६ डझन म्हणजेच ७२ नग आंब्यांची होती. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी कोल्हापूरच्या श्री शाहू मार्केट यार्डमधील फळ मार्केटमध्ये हंगामातील हा पहिलाच लिलाव पार पडला.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील स्वप्नील तांबे आणि तानाजी तांबे या शेतकरी बंधूंच्या बागेतील दर्जेदार हापूस आंब्याला हा विक्रमी दर मिळाला. लिलावात सुरुवातीला २० हजार रुपयांपासून बोलीला प्रारंभ झाला. त्यानंतर वाढत गेलेल्या बोलीने थेट ५५ हजार रुपयांचा टप्पा गाठला.

या दराची विशेष बाब म्हणजे, ७२ आंब्यांच्या पेटीला ५५ हजार रुपये मिळाल्याने एका आंब्याची सरासरी किंमत तब्बल ७६३ रुपये इतकी झाली आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच हापूसने लावलेली ही विक्रमी बोली पाहता, यंदाच्या आंबा हंगामात दरांचे नवे विक्रम होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे!


कोल्हापुरात हापूसचा ऐतिहासिक लिलाव!
Total Views: 14