विशेष बातम्या
इचलकरंजीसाठी 700 कोटींचा ऐतिहासिक विकासनिधी मंजूर!
By nisha patil - 6/6/2025 3:32:40 PM
Share This News:
इचलकरंजीसाठी 700 कोटींचा ऐतिहासिक विकासनिधी मंजूर!
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना मिळाले मोठे यश
इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून शासनाकडून तब्बल ₹700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच महापालिकेच्या थकित GST अनुदानापैकी ₹657 कोटींचा निधीही मंजूर झाला आहे.
या ऐतिहासिक निधीमुळे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य व नागरी सुविधा यामध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. या यशस्वी प्रयत्नाबद्दल महानगरपालिका मुख्य कार्यालयात आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध युनियन पदाधिकारी, माजी नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इचलकरंजीसाठी 700 कोटींचा ऐतिहासिक विकासनिधी मंजूर!
|