बातम्या
"कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा–कुणबी समाजाची ऐतिहासिक नोंद; आरक्षण चर्चेत नव्याने महत्त्व"
By Administrator - 8/9/2025 3:37:01 PM
Share This News:
"कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा–कुणबी समाजाची ऐतिहासिक नोंद; आरक्षण चर्चेत नव्याने महत्त्व"
कोल्हापूर गॅझेटने मराठा आरक्षणाच्या चर्चेत आता एंट्री घेतली आहे. 1881 साली ब्रिटिशांनी तयार केलेल्या या गॅझेटमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास, समाजव्यवस्था आणि परंपरा यांचा सविस्तर उल्लेख आहे.
त्यात मराठा समाज मूळतः कृषीप्रधान कुणबी समाजातून उदयास आलेला असल्याचेही नमूद आहे. मराठा आणि कुणबी समाजाच्या ऐतिहासिक नोंदीमुळे गॅझेटला आरक्षणाच्या लढाईत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, काही नेत्यांनी या गॅझेटमध्ये छेडछाड झाल्याचा आरोपही केला आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेट चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
"कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा–कुणबी समाजाची ऐतिहासिक नोंद; आरक्षण चर्चेत नव्याने महत्त्व"
|