बातम्या
लावणी साम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक विक्रम!
By nisha patil - 12/6/2025 8:50:32 PM
Share This News:
लावणी साम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक विक्रम!
१०० लावण्या, एक दिवस, एकच मंच – कोल्हापूरमध्ये जागतिक रेकॉर्डचा महाउत्सव!
सरगम म्युझिकल ग्रुप (SA) यांच्या वतीने लावणी साम्राज्ञी स्व. सुलोचना चव्हाण यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १५ जून २०२५ रोजी कोल्हापुरात सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात १०० हून अधिक लावण्यांच्या सादरीकरणातून "पहिला ग्लोबल जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड" स्थापित करण्यात येणार आहे.
या उपक्रमामध्ये प्रत्येक सहभागी कलाकाराचे नाव ग्लोबल जिनियस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले जाणार आहे. या निमित्ताने सुलोचना चव्हाण यांना आदरांजली वाहत कोल्हापूरचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिकप्राप्त होणार आहे.
प्रत्येक सहभागी कलाकारास सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहून गायक, वादक व कलाकारांचे प्रोत्साहन करावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा:
📞 डॉ. आशा शितोळे – 8329141296
📞 प्रो. सुभाष भाट – 9867120663
लावणी साम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक विक्रम!
|