बातम्या
इंडियन मिलिटरी ॲकॅडमीत इतिहास : कोल्हापूरच्या सई जाधवची पहिली महिला कॅडेट म्हणून निवड
By nisha patil - 12/19/2025 3:42:06 PM
Share This News:
इंडियन मिलिटरी ॲकॅडमीत इतिहास : कोल्हापूरच्या सई जाधवची पहिली महिला कॅडेट म्हणून निवड
डेहराडून येथील ९३ वर्षांचा इतिहास असलेल्या इंडियन मिलिटरी ॲकॅडमीतून कोल्हापूरच्या सई संदीप जाधव हिने पहिली महिला कॅडेट म्हणून सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत इतिहास घडवला आहे.
यंदा प्रथमच महिलांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलेल्या ॲकॅडमीसाठी देशभरातून हजारो मुलींनी अर्ज केले होते. निवड प्रक्रियेतून ३० मुलींची छाननी झाली. भोपाळ येथील सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड, वैद्यकीय आणि लेखी चाचणीनंतर एकमेव रिक्त जागेसाठी सई जाधवची अंतिम निवड करण्यात आली.
सोळा पुरुष कॅडेट्समध्ये एकमेव महिला म्हणून सईने कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. अवघ्या २३ व्या वर्षी तिने प्रादेशिक सेना अधिकारी होण्याचा मान मिळवला असून, सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणारी ती इंडियन मिलिटरी ॲकॅडमीतील पहिली महिला ठरली आहे.
सई जाधव मूळची जयसिंगपूर येथील आहे. तिचे शिक्षण जयसिंगपूर, अंदमान-निकोबार, कोईमतूर, बेळगाव आणि कोल्हापूर येथे झाले. विवेकानंद महाविद्यालयातून बीएस्सी पदवी मिळवून ती ‘सिंबॉयसिस’मधून एमबीएचे शिक्षण घेत होती. लष्करी परंपरेचा वारसा घरातून मिळाल्याने तिने हे यश संपादन केले आहे.
इंडियन मिलिटरी ॲकॅडमीत इतिहास : कोल्हापूरच्या सई जाधवची पहिली महिला कॅडेट म्हणून निवड
|