बातम्या
होळी महोत्सवाची उत्साहात सांगता; भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद*
By Administrator - 9/3/2026 3:18:26 PM
Share This News:
होळी महोत्सवाची उत्साहात सांगता; भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद*
रवळनाथ कॉलनीत विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे नेटके आयोजन
आजरा (हसन तकीलदार): रवळनाथ कॉलनी येथे दिनांक ३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या होळी महोत्सवाची सांगता ७ मार्च रोजी भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेने मोठ्या उत्साहात झाली. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक परशुराम बामणे भाऊजी व रवळनाथ कॉलनीचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी या उपक्रमांसाठी संयोजकांना प्रोत्साहन दिले. त्याबद्दल संयोजकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
महोत्सवात फनी गेम्स, लिंबू-चमचा, संगीत खुर्ची तसेच लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आली. तसेच पाककला व होम मिनिस्टर स्पर्धांनाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले, तर सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
पाककला स्पर्धेतील विजेते :
१) सौ. माही टोपले – (किरण कारेकर यांच्याकडून होम अप्लायन्स)
२) सौ. सुरेखा बचुटे – (मराठा प्रतिष्ठान मित्र यांच्याकडून होम अप्लायन्स)
३) सौ. मनिषा बुधवंत – (मराठा प्रतिष्ठान मित्र यांच्याकडून होम अप्लायन्स)
होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेते :
१) सौ. गीता पंडीत – पैठणी, होम अप्लायन्स व सन्मानचिन्ह
२) सौ. सुधा उपासे – होम अप्लायन्स व सन्मानचिन्ह
३) सौ. सुपर्णा सलामवाडे – होम अप्लायन्स व सन्मानचिन्ह
या स्पर्धेतील सर्व बक्षिसे व सन्मानचिन्हे नगरसेवक परशुराम बामणे भाऊजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील विजेते :
प्रथम क्रमांक (रु. ७०००/- विभागून) – कु. परिणिती केकतपुरे, कु. अनुष्का भंडारी
( उत्तम सलामवाडे व स्वप्निल सावंत यांचेकडून)
द्वितीय क्रमांक (रु. ४०००/- विभागून) – के. संतोष, विजय अलासे, नटराज ग्रुप, आशिष पाटील
(गजानन पारपोलकर व सिद्धेश पारपोलकर यांचेकडून)
तृतीय क्रमांक (रु. ३०००/- विभागून) – शुभ्रा ढवळ, सुरज साळगांव, दिपक कानडे
(इंजी. सचिन पाटील व रमेश पोवार यांचेकडून)
चतुर्थ क्रमांक (रु. २०००/- विभागून) – कु. शरण्या कुंभार व कु. सिध्दी नाईक, कु. सुहानी ठाकर
(अमित अनिल पाटील यांच्याकडून)
भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील विजेत्यांना पांडुरंग गणपती सावरतकर यांचेकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रवळनाथ कॉलनी होळी महोत्सव संयोजकांच्या वतीने सर्व वर्गणीदार, देणगीदार व इतर सहकार्य केलेल्या हितचिंतकांचे व प्रेक्षक वर्गाचे आभार मानण्यात आले.*3मार्च ते 7मार्च पर्यंत रवळनाथ कॉलनीमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. या सर्व कार्यक्रमांचा प्रक्षकांनी मनमुराद आनंद घेतला
होळी महोत्सवाची उत्साहात सांगता; भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद*
|