बातम्या
सर्व आस्थापनेतील, कारखान्यातील कामगारांना मतदानाचा हक्क बजवण्याकरीता सुट्टी जाहीर
By nisha patil - 1/12/2025 5:05:34 PM
Share This News:
सर्व आस्थापनेतील, कारखान्यातील कामगारांना मतदानाचा हक्क बजवण्याकरीता सुट्टी जाहीर
कोल्हापूर, दि. 1 : राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणुकीचे मतदान दिनांक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना हक्क बजावण्यासाठी महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन परिपत्राव्दारे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. मध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 2 डिसेंबर रोजी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेल्या निर्देशानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
इचलकरंजी उपविभागातील सर्व कामगार मतदारांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, इचलकरंजी, गेट नं.2. राजाराम स्टेडियम, बस स्थानक समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे दुरुध्वनी क्रमांक 0230-2421391 आणि ईमेल आयडी aclichalkaranji@gmail.com या ठिकाणी तक्रार दाखल करावी, असे आवाहन इचलकरंजीच्या सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी केले आहे.
सर्व आस्थापनेतील, कारखान्यातील कामगारांना मतदानाचा हक्क बजवण्याकरीता सुट्टी जाहीर
|