ताज्या बातम्या
बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार - डॉ.स्वाती पाटील
By nisha patil - 8/27/2025 12:14:46 PM
Share This News:
बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार - डॉ.स्वाती पाटील
बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळासह भेटणार – डॉ. स्वाती पाटील
जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर आणि स्वमालकीची जागा नसलेल्या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळासह भेटणार असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचीव डॉ. स्वाती दिपक पाटील यांनी केले.
भटका समाज मुक्ती आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वाठार–वडगांव रोडवरील इरा हॉल येथे झालेल्या परिवर्तन संकल्प मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भिमराव साठे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार - डॉ.स्वाती पाटील
|