बातम्या
शासकीय अध्यापक महाविद्यालयात गुणवंतांचा गौरव
By nisha patil - 9/19/2025 12:20:45 PM
Share This News:
शासकीय अध्यापक महाविद्यालयात गुणवंतांचा गौरव
कोल्हापूर : येथील श्री महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून यावर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये ऐश्वर्या आकाराम मोरे हिने प्रथम येण्याचा बहुमान पटकावला तर वैष्णवी नवनाथ ठाकरे हिने गुणवत्ता यादीत दुसरे स्थान मिळवले .
महाविद्यालयाच्या पौर्णिमा चांदेकर आणि अंकिता शिंदे यांनी गुणवत्ता यादीत अनुक्रमे पाचवे आणि दहावे स्थान पटकावले . या सर्वांना प्राचार्या डॉ. लता पाटील, डॉ. अजय साळी, डॉ. गौतम माने, डॉ. तारसिंग नाईक आणि प्राध्यापक प्रविण चाकोते यांचे मार्गदर्शन लाभले .
शासकीय अध्यापक महाविद्यालयात गुणवंतांचा गौरव
|