बातम्या
स्वातंत्र्यदिनी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
By nisha patil - 8/15/2025 3:07:56 PM
Share This News:
स्वातंत्र्यदिनी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट २०२५ – महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयात ७९ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उत्कृष्ट ग्राहकसेवा देणारे ३९ अधिकारी - कर्मचारी यांचा व १९ गुणवंत पाल्य यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, कार्यकारी अभियंते दत्तात्रय भणगे, अजित अस्वले, अशोक जाधव, सुधाकर जाधव, सागर मारुळकर, निलेश चालिकवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, व्यवस्थापक (वित्त व लेखा) स्नेहा पारटे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.%5B11%5D.jpg)
महावितरणचे उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी : अक्षय पाटील, प्रकाश पाटील, अक्षय पाटील, अविनाश बुरुड, निखिल पोवार, विनायक पाटील, किरण पाटील, सुहास पाटील, चंद्रकांत इंजर, सुरेश जाधव, सागर देसाई, पंढरीनाथ भालेकर, किरण स्वामी, बालाजी माने, टेकाचंद चकाटे, गजानन कोळी, मयुर राजमाने, समीर शेख, नारायण गायकवाड, महेश तोडकर, आशुतोष भबिरे, संजय कोळी, रोहित वसवाडे, रोहित बागडी, अजित पोवार, विठ्ठल चौगुले, अम्र माळवी, शांताराम भिऊंगडे, नारायण दळवी, दिपक गावडे, ओमप्रकाश पटेल, प्रदिप वंजारे, अमित गावडे, अमोल दळवी, राहुल कांबळे, लक्ष्मण सुतार, संभाजी कांबळे, नितीन सावर्डेकर, नजीरअहमद मुजावर
गुणवंत पाल्य : अशुतोष धमाळ, तन्वी आबीटकर, अर्थव कुमार, सुजल माळवदे, सिध्दी नलवडे, शिवम खाडे, आरव पाटील, राजवीर गायकवाड, स्वरा प्रशांत राणे, आराध्य जाधव, विघ्नेश शिंदे, आरुष मारुलकर, श्रुती मारुलकर, ऋग्वेद कोळेकर, अर्णव घारगे, वरद लांडगे, स्वराज रावण, गौरी पवार, शौर्या पाटील
स्वातंत्र्यदिनी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
|