बातम्या
नवरात्रीत उपास करणाऱ्या महिलांचा सन्मान...
By nisha patil - 1/10/2025 4:17:06 PM
Share This News:
नवरात्रीत उपास करणाऱ्या महिलांचा सन्मान...
खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून साडी वाटप
कोल्हापूर : गोंधळी जोशी समाज हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असून समाजाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केले. नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त जोशी गल्लीतील दुर्गादेवी टेमलाई व मरगाई येथील दुर्गामाता मंदिरात महिलांनी नऊ दिवस अखंड उपास धरून देवीची आराधना केली.
या महिलांचा सन्मान करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते ४२ महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे नवरात्रीत भक्तिभाव आणि स्त्रीशक्तीचा सन्मान अधोरेखित झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष भरत काळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी के. एम. चौगुले, आनंद काळे, सुशांत पाटील, बाळासो काळे, अमर मोरे, अभिजीत गजगेश्वर, बजरंग माने, शंकरराव मोरे, लक्ष्मण शिंदे, संदीप काळे, बाळासाहेब कवडे आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या साडीवाटप उपक्रमामुळे उपास करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.
नवरात्रीत उपास करणाऱ्या महिलांचा सन्मान...
|