बातम्या

तळसंदे शिक्षण संकुलातील वसतिगृह मारहाणी प्रकरण; 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Hostel assault case in Talsande Education Complex

By nisha patil - 10/18/2025 3:44:04 PM
Share This News:

तळसंदे शिक्षण संकुलातील वसतिगृह मारहाणी प्रकरण; 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संकुलाच्या वसतिगृहात 9 मार्चला झालेल्या अमानुष मारहाणीप्रकरणी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठ्या वर्गातील या विद्यार्थ्यांनी नऊ लहान विद्यार्थ्यांवर कमरेचा पट्टा, प्लास्टिक बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.

मारहणीचा व्हिडीओ 10 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हा आणि राज्यात संतापाची लाट पसरली. घटनेची गंभीर दखल घेत सामाजिक संघटनांनी चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत.

तळसंदे शिक्षण संकुलातील वसतिगृह मारहाणी प्रकरण; 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Total Views: 130